इतिहास

टोपीवाला हायस्कुल ची स्थापना १० एप्रिल १९११ रोजी झाली. शिक्षणाच्या अपु-या सोयी सुविधा लक्षात घेऊन  मालवण मध्ये एक नविन हायस्कुल काढण्याचा संकल्प स्व. श्री. बाबासाहेब वराड्कर, स्व. श्री. बापुसाहेब देसाई, स्व. श्री. क्रुष्णराव देसाई, स्व. श्री. विनायक आजगावकर, स्व. डॉ. राजाराम आजगावकर यांनी आखला. भाऊसाहेब टोपीवाले यांनी शाळेसाठी दहा हजार रुपये देणगी दिली. या देणगी मुळे शाळेची सुरुवात झाली. जागेअभावी मालवण बंदरावरील लाडोबांच्या वखारीत शाळा भरु लागली. त्यानंतर झांट्ये, कामत, शेठ विठ्ठ्ल दास यांच्या वखारी भाड्याने घेउन शाळेचे वर्ग त्या काळात चालले. शाळेसमोरच्या अड्चणी व गरजा लक्षात घेऊन भाऊसाहेब टोपीवाले यांनी सव्वा लाखाची देणगी देऊन शाळेची इमारत उभी केली व शाळेच्या इतर खर्चाकरीता पंच्याह्त्तर हजार रुपये दिले. शाळा, मैदान, वसतीग्रुह यासाठी पंधरा एकर जागा उपलब्ध करुन दिली.

१९१२ मध्ये शाळा सरकार मान्य झाली व १९१३ मध्ये तिला शासकिय अनुदानही  मिळाले.

१९१५ पर्यंत भाऊसाहेब टोपीवाले स्वत: शाळेचा कारभार चालवत. त्यानंतर स्वतंत्र सोसायटीची स्थापना करुन भाऊसाहेब टोपीवाले यांनी आपल्याकडील सर्व कारभार सोसायटीकडे सोपविला. इ.स. १९११-१२ व १९२८-२९ या कालावधीसाठी स्व. गुरुवर्य बाबासाहेब वराड्कर हे शाळेचे मुख्याध्यापक बनले. त्यांच्या निग्रही व धडाडी व्रुत्तीमुळे शाळेस प्रगतीची दिशा मिळाली. १९१२-२८ या कालावधीत भाउसाहेब परुळेकर शाळेला मुख्याध्यापक म्ह्णुन लाभले. त्यांच्या कारकिर्दीत शाळेचे कार्यालय व ग्रंथालय यासाठी स्वतंत्र इमारत बांधुन झाली. १९२७ मध्ये स्व. महादेव बापुजी झांट्ये यांच्या स्मरणार्थ चित्रकला वर्ग व सुतारकाम वर्ग या इमारती बांधण्यात आल्या. त्याच दरम्यान स्व. दत्तात्रय खांडाळेकर यांच्या स्मरणार्थ प्रयोगशाळा बांधण्यात आली. १९२९-३३ पासुन स्व. विनायक आजगावकर यांची मुख्याध्यापक म्हणुन नियुक्ती झाली. त्याच्या कारकिर्दित बोर्डिंग ग्राऊंड येथील वसतीग्रुहाच्या दोनही इमारती बांधुन पुर्ण झाल्या.

१९२१ साली भाउसाहेब टोपीवाले याचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव नारायणराव देसाई यांनी कारभार वाहिला. १९३३ साली त्यांचेही दु:खद निधन झाले. त्यानंतर मोतीराम शेठ यांनी आपल्या वडील व आजोबांची परंपरा पुढे चालु ठेवली. आता त्यांचे पुत्र विकास शेठ टोपीवाले हे संस्थापकाचे प्रतिनीधी म्हणुन काम पाहत आहेत.

१९३३ मध्ये स्व. वामन राव खानोलकर मुख्याध्यापक झाले. त्यानंतर १९३९ मध्ये श्री. यशवंत सामंत यांची नियुक्ती झाली. १९४२ मध्ये स्व. जे. एम. सामंत, १९४८ मध्ये स्व. आर. व्ही. महाजन, १९५० मध्ये स्व. दिवाकर सामंत, १९५३ मध्ये स्व. म. वि. परुळेकर, १९५६ मध्ये स्व. ग. ह. नागनुर, १९६६ मध्ये स्व. वसंत सामंत यांनी मुख्याध्यापक पदाचा कारभार साभाळला.

१९७२ साली स्व. रघुनाथ कामत याच्या देणगीतुन “दिगंबर स्म्रुती” ही इमारत साकार झाली. स्व. बापुसाहेब पंतवालावलकर याच्या देणगीतुन पाच खोल्यांची प्राथमिक शाळेची पायबांधणी झाली. १९७३ मध्ये श्री. ज. वि. गोलिवडेकर हे मुख्याध्यापक झाले. १९७५ पासुन कला, विज्ञान व वाणिज्य विभागचे वर्ग जोडुन मिळाले. १९८५-२००२ पर्यंत सलग १७ वर्षे श्री. प्रकाश प्रभु यांनी टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक म्हणुन काम पाहीले. त्यांच्या कारकिर्दीत प्राथमिक शाळेची इमारत व अभ्यागत ग्रुह बांधण्यात आले. स्व. कमलाकर झांट्ये व श्रीमती कमलिनी झांट्ये यांच्या मुलींनी शाळेच्या ग्रंथालयासाठी खोली व विद्यार्थ्यांसाठी स्वच्छताग्रुहाची इमारत बांधुन दिली. स्व. नर्मदबाई देसाई टोपीवाले यांच्या देणगीतुन व्यावसायिक अभ्यासक्रमाची ईमारत बांधुन पुर्ण करण्यात आली. इ.स. २००२ मध्ये श्री. एस. एस. तोरगलकर यांची  मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाली. २००३ मध्ये स्व. जयंतराव साळगांवकर यांच्या भरघोस देणगीतुन ‘जय गणेश इंग्लिश मिडीयम’ स्कुलचा प्रारंभ करण्यात आला. २००५ मध्ये श्री. ल. धो. सावंत यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाली. २००७ मध्ये श्री. रघुनाथ शेवडे यांनी कार्यभार सांभाळला व २०१२ मध्ये श्री.एस. डी. पाटील यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *