कार्यशाळा

राष्ट्र सुसंपन्न,नीतिसंपन्न व किर्तीसंपन्न घडवायचे असेल तर व्यक्तिकेंद्रीत विकासाचा दृष्टीकोन ठेवावाच लागतो कारण व्यक्ती सर्वगुणसंपन्न झाली तरच समाज संपन्न होतो आणि समाजाच्या संपन्नतेतुनच राष्ट्राची संपन्नता वाढीस लागते. या चक्राचे व्यापकत्व जपण्यासाठी माणसाचे माणुसपण प्रथम जपावे लागते. हे ‘माणुसपण’ जपण्यासाठी ना.अ.दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीमती वंदना करंबळेकर यांची ‘तरुण वर्गाची मानसिकता व जिवनमुल्यांचे महत्त्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ज्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सभाधीटपणा कमी आहे. वर्गात उत्तरे सांगताना, बोलताना जे विद्यार्थी घाबरतात. अशा ११ वी च्या वर्गातील ४० विद्यार्थ्यांची निवड या कार्यशाळेसाठी करण्यात आली.

कार्यशाळेचा प्रारंभ मा. श्रीमती वंदना करंबळेकर यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या सुंदर अशा गीताने केली. यानंतर त्यांनी ‘तरुण वर्गाची मानसिकता’ या विषयावर विद्यर्थ्यांशी चर्चा केली.

आपले आई वडील आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आपल्या आई-वडीलांसाठी आपण असणं खुप महत्त्वाच असत. मानवी शरीर कोट्यावधी रुपये किमतीचे आहे. या मानवाचा शारिरीक व मानसिक विकास साधायचा असेल तर मानवाने निसर्गाला गुरु केले पाहिजे. काही कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाने स्वत:ला ओळखले पाहिजे; बोलते झाले पाहिजे. जो बोलतो, तोच समाजात टिकून राहतो. त्यासाठी ‘आत्मविश्वास’ आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीमती वंदना करंबळेकर यांनी या कार्यशाळेच्या वेळी केले.

या कार्यशाळेच्या उत्तरार्धात त्यांनी विद्यार्थ्यांची आत्मविश्वासाच्या संदर्भात चाचणी घेऊन त्याबाबत मिळालेल्या निकषांवर विश्लेषण केले. त्यानंंतर पाच पाच विद्यार्थ्यांचे गट करून विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या संदर्भात काय  वाटले  हे गटप्रमुखाने व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साह वाखाण्याजोगा होता.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. मणेरीकर सर यांनी केले. आभार सौ. धामापूरकर मॅडम यांनी मानले. तर सुत्रसंचालन सौ. रावराणे मॅडम यांनी केले.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. दिगंबर सामंत सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. साटम सर व कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. कदम सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यशाळेचे दुसरे सत्र याच विद्यार्थ्यांसाठी आणि स्वत: वंदना करंबळेकर  सहभागी विद्यार्थी,शिक्षक वर्ग यांनी घेण्यात यावे असा आग्रह धरल्याने जुनच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे ठरविण्यात आले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *