व्हॉलीबॉल प्रशिक्षण

टोपीवाला हायस्कुल मध्ये व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर प्रशालेच्या मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. या शिबीराला आलेला खर्च टोपीवाला हायस्कूल, माजी विद्यार्थी संघटनेने केलेला आहे. या शिबीरामध्ये प्रशालेतील ६० मुलांनी सहभाग घेतला. कोल्हापूर विभागाचे शासकीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक श्री. अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. व्हॉलीबॉल खेळातील प्राथमिक कौशल्ये, खेळाडुंचा फिजीकल फिटनेस, आहार, खेळाला पुरक व्यायाम प्रकार इ. बाबींवर शिबीरामध्ये खेळाडुंना मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *